|
|
| दृष्टीक्षेप |
| |
| |
| |
 |
|
बाजारांसाठीचे ज्ञान हे फायनान्शियल टेक्नॉलॉजिज समुहाच्या फायनान्शियल टेक्नॉलॉजिज नॉलेज मॅनेजमेण्ट कंपनी (एफटीकेएमसी)चे प्रमुख कार्य आहे. एफटीकेएमसी इक्विटी, कमोडिटी, करन्सी, बॉण्ड्स, डेब्टसहित जवळपास सर्व प्रमुख असेट्सच्या बाजारपेठांसाठी तथा बँकिंग आणि फायनान्शियल सेवेसाठी ज्ञानसंबंधी कार्य करते. त्यात व्यापारी रणनीती बनवून देते तथा |
|
| |
त्यांच्यासाठी लागणारे उपाय निर्माण करते. आर्थिक शिक्षण व प्रशिक्षण, कन्सल्टन्सी, संशोधन आणि प्रकाशन तथा सल्लागार सेवादेखील हिच्या सेवांच्या कक्षेत येतात. एफटीकेएमसीने तयार केलेल्या अभ्यासक्रमात बाजारातील व्यवहारांना लक्षात ठेवण्यात येते तथा उपयुक्त ज्ञान दिले जाते. या अभ्यासक्रमांना बाजारांकरिता धोरण घडविणा-या संस्था, नियामक संस्था, बाजारांचे मध्यस्थ आणि गुंतवणूकदार समूदायाकडून व्यापक स्वीकृती मिळाली आहे.
ज्ञानसंबंधी कार्याच्या विस्तारासाठी स्वतः केलेल्या हालचालींव्यतिरिक्त एफटीकेएमसीला फायनान्शियल टेक्ट्नॉलॉजिज (एफटी)द्वारा स्थापन झालेल्या विशाल इकोसिस्टमकडून मदत मिळते. एफटीच्या इकोसिस्टममध्ये भारतातील पहिल्या क्रमांकाचे कमोडिटी एक्सचेंज - मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लि. (एमसीएक्स); करन्सी फ्युचर्स व्यापारात अग्रस्थानी असलेले भारताचे नवे स्टॉक एक्सचेंज - एमसीएक्स स्टॉक एक्सचेंज लि. (एमसीएक्स-एसएक्स); कृषीविषयक स्पॉट ट्रेडिंगसाठीचे - नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड (एनएसईएल); ऊर्जा ट्रेडिंगसाठीचे इंडियन एनर्जी एक्सचेंज लिमिटेड (आयईएक्स); कोठारासाठीचे नॅशनल बल्क हॅण्डलिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (एनबीएचसी); फायनान्शियल डेटा वितरणासाठीचे टिकर प्लॅण्ट
इन्फोवेण्डिंग लिमिटेड; मोबाईल पेमेण्ट सोल्यूशन्ससाठी,
एटम टेक्नॉलॉजिज लिमिटेड आणि क्रेडिट मार्केटमध्ये उत्कृष्ठ पद्धती निर्माण करण्याकरिता स्थापन झालेले क्रेडिट मार्केट सर्विसेस लिमिटेड (सीएमसीएल) अशा मातब्बर कंपन्यांचा समावेश आहे. एफटीच्या आंतरराष्ट्रीय एक्सचेंजमधे सिंगापूर मर्कण्टाइल एक्सचेंज, मॉरिशसमधील ग्लोबल बोर्ड ऑफ ट्रेड (जीबीओटी), दुबई गोल्ड
एण्ड कमोडिटी एक्सचेंज (डीजीसीएक्स), बोत्स्वानामधील बूर्स अफ्रिका आणि बेहरिन फायनान्स एक्सचेंज (बीएफएक्स) सामील आहेत. या सर्वांशी असलेल्या हितसंबंधांमुळे एफटीकेएमसीला ज्ञानवर्धन कार्यात अनोखी शक्ती आणि फायदा मिळतो.
एफटीकेएमसी फायनान्शियल मार्केटसंबंधी विशिष्ट विषयांवर संवाद आणि चर्चा घडवून आणण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्यासाठीदेखील प्रयत्नशील आहे. यासंबंधीचे काही महत्त्वपूर्ण प्रयत्न पुढीलप्रमाणेः |
- रणनीतीसंबंधी संवादः यामध्ये अर्थव्यवस्था, वित्त आणि तंत्रज्ञानाचा विस्तार, कामकाजाची पद्धत आणि प्रगती या विषयांवर धोरणात्मक चर्चेला प्रोत्साहन देण्यात येते.
- फायनान्शियल मार्केट व्यासपीठः
यात फायनान्शियल मार्केटमधील धोरणे आणि पद्धतींवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्र तथा सम्मेलनांचे आयोजन केले जाईल.
- फायनान्शियल मार्केटची समीक्षाः
फायनान्शियल मार्केटची वार्षिक समीक्षा केली जाते, ज्यात भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय अग्रगण्य व्यावसायिकांचे योगदान असते.
- भारतीय नेतृत्व शृंखलाः भारतीय अर्थ आणि वित्तव्यवस्थेतील विविध क्षेत्रांत झालेल्या वृद्धिचे आकलन करण्यासाठी तथा त्यातील महत्त्वाच्या कंपन्या आणि व्यक्तींच्या कलागुणांना प्रकाश झोतात आणण्यासाठी घेण्यात आलेला पुढाकार म्हणून हे कार्य प्रारंभ केले गेले आहे.
- पत्ता:
फायनान्शियल टेक्नॉलॉजिज नॉलेज मॅनेजमेण्ट कंपनी
(फायनान्शियल टेक्ट्नॉलॉजिज ग्रुपची कंपनी)
पहिला मजला, एक्सचेंज स्क्वेअर
सुरेन रोड, चकाला, अंधेरी (पूर्व),
मुंबई - ४०००९३
दूरध्वनी क्र.: +९१-२२-६७३१८८८८
फॅक्स: +९१-२२-६६४०४१८९
ईमेल: knowledgeformarkets@ftkmc.com
वेबसाइट: www.ftkmc.com
|
| |
|
|
| |
|
|
|