गुंतवणूकदार स्वतःच्या तक्रारींच्या निवारणासाठी एक्सचेंजच्या कायदा खात्यातील गुंतवणूकदार तक्रार विभागाकडे (आयजीडी) त्यांचे म्हणणे मांडू शकतात. एक्सचेंजकडे तक्रारदार आणि सदस्य यांच्यात समन्वय साधून वादविवाद सोडविण्याची यंत्रणा आहे.
“ग्राहक तक्रार अर्जा”द्वारे (सीसीएफ) कोणताही गुंतवणूकदार किंवा मध्यस्थ त्याची तक्रार एक्सचेंजच्या आयजीडी विभागाकडे नोंदवू/मांडू शकतो.
एक्सचेंजने ठरविलेल्या स्वरूपात तक्रार प्राप्त झाल्यानंतर, एक्सचेंज प्रथमतः तक्रारदार आणि सदस्य यांच्याकडे पाठपुरावा करून वादविवाद सोडवण्याचा प्रयत्न करते. वाद किंवा तक्रारीचे निवारण सामोपचाराने व्हावे यासाठी एक्सचेंज उभयतांचे योग्य समुपदेशनही करते. साधारणतः साठ (६०) दिवसांच्या कालावधीत तक्रारीचे निवारण केले जाते. मात्र, या कालावधीतही तक्रारीचे निवारण झाले नाही तर ते प्रकरण लवादांकडे सोपवले जाते.
कुठल्याही सदस्याविरुद्ध तक्रार नोंदविण्यासाठी गुंतवणूकदार इथे ई-मेल पाठवू शकतातः grievance@mcxindia.com
कमोडिटी फ्युचर्सच्या नवीनतम किमतींसाठी MCX <space> <Commodity Name>" टाइप करून ५८८८८ वर एसएमएस करा.