भारतातील आघाडीचे कमोडिटी एक्सचेंज असलेल्या एमसीएक्सचा भर हा एक चांगल्या कॉर्पोरेट नागरिकत्वावर आहे. ज्या समाजात आपण काम करतो त्या समाजाला आपण काही देणं लागतो ही भावना आम्ही कॉर्पोरेट सामाजिक संधी या तत्त्वांतर्गत काम करताना एक ध्येय म्हणून ठेवली आहे. हा भारतातील शेतकरीवर्गापर्यंत पोहोचण्याच्या एमसीएक्सच्या प्रयत्नाचा एक भाग आहे. एमसीएक्स कमोडिटीचे उत्पादक व ग्राहक यांच्या जागतिक साखळीत भारताच्या मोठ्या कृषी क्षेत्राला जोडण्याचे काम करते. भारताचे पूर्व राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते प्राप्त झालेल्या ईएमपीआय – इंडियन एक्स्प्रेस इंडियन इनोव्हेशन
एवॉर्डस् २००६बद्दल आम्हाला अभिमान आहे.
वैश्विक पर्यावरणीय आणि सामाजिक तत्त्वांना पुरस्कृत करणा-या यूएन ग्लोबल कॉम्पॅक्ट अभियानात एमसीएक्स सामील आहे. सीआयआयच्या पश्चिम विभागाच्या सीएसआर समितीवरही एमसीएक्स असून विविध भागीदारी मॉडेल्सवर काम करत आहे.
ग्रामीण सुविधा केंद्र, हे एमसीएक्स आणि इंडिया पोस्ट यांनी संयुक्तरित्या चालविलेले अभियान आहे. याद्वारे लहान गावांतील पोस्ट ऑफिसे व उर्वरित भारत यांच्यात इलेक्ट्रॉनिक प्राइस लिंक पुरविली जाते. यामुळे शेतक-यांना कोणते पीक घ्यावे आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने आपले उत्पादन केव्हा विकावे हा निर्णय घेण्यास मदत होते.
कमोडिटी फ्यूचर्सच्या नवीनतम किमतींसाठी “MCX <space> <Commodity
Name>“ टाइप करून ५८८८८ वर एसएमएस करा.