होम    आमच्या विषयी    कारकीर्द    संपर्क    प्रतिक्रिया    सामान्य प्रश्न     साइटमॅप      
पर्यायी भाषा:  English | ગુજરાતી | हिंदी
 
MCX MARKET OPERATIONS MCX MARKET DATA Products MCX MEMBERSHIP MEDIA ROOM FTKMC - KNOWLEDGE HUB CORPORATE SOCIAL OPPORTUNITIES INVESTORS DOWNLOADS

 
 
 
महत्वाचे क्षण
 
ऑक्टोबर 03, 2011   कॉटनमधील फ्युचर्सची आमच्या कंपनीकडून सुरूवात
सप्टेंबर 2011   आमचे एक्स्चेंज जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे कमोडिटी एक्स्चेंज ठरले. जानेवारी ते जून 2011 दरम्यान जितके फ्युचर्स कॉण्ट्रॅक्टचे व्यवहार झाले ती आकडेवारी यासाठी लक्षात घेण्यात आली. फ्युचर्स इंडस्ट्री असोसिएशन (एफआयए) च्या व्हॉल्यूम सर्व्हे आणि मार्केट डेटावर ती आधारित होती.
सप्टेंबर 23, 2011   आमच्या कंपनीने रू. 1116.66 बिलीयनचे सर्वाधिक दैनिक टर्नओव्हर प्राप्त केले.
एप्रिल 18, 2011   सुवर्ण पाकळी, 1 ग्राममधील फ्युचर्स कॉण्ट्रॅक्टची आमच्या कंपनीकडून सुरूवात.
फेब्रुवारी 18, 2011   सिलव्हर माइक्रो, 1 किग्रा चांदीमधील फ्युचर्स कॉण्ट्रॅक्टची आमच्या कंपनीकडून सुरूवात.
डिसेंबर 20, 2010   भारतात कमोडिटी फ्युचर्स बाजारपेठेच्या विकासासाठी तैवान फ्युचर्स एक्सचेंजशी आमच्या कंपनीने सामंजस्य करार केला.
डिसेंबर 9, 2010   आमच्या कंपनीने कमोडिटी इनसाईटस इयरबुक 2010 प्रकाशित केले. पीडब्ल्यूसीचाही यात सहभाग होता.
ऑक्टोबर 20, 2010   ब्युरो वेरिटास सर्टिफिकेशन (इंडिया) यांच्यातर्फे देण्यात आलेल्या आयएसओ 9001:2008 प्रमाणपत्राचे नूतनीकरण आमच्या कंपनीला मिळाले.
जून 7, 2010   शांघाय फ्युचर्स एक्स्चेंजशी आमच्या कंपनीने सामंजस्य करार केला.
डिसेंबर 3, 2009   जानेवारी ते जून 2009 या कालावधीत कंपनीने केलेल्या एकंदर सौद्यांच्या संख्येवर आमची कंपनी जागतिक स्तरावर वस्तूंचा वायदेबाजार करणारी सहाव्या क्रमांकाची कंपनी ठरली.
नोव्हेंबर 30, 2009   एक्स्चेंज ऑफ फ्युचर्स फॉर फिजिकल्स (ईएफपी) ट्रँझॅक्शन्सची आमच्या कंपनीने सुरुवात केली.
ऑक्टोबर 14, 2009   प्राइसवॉटरहाऊसकूपर्सच्या सहकार्याने आमच्या कंपनीने इंडियन कमोडिटी इकोसिस्टिमवरील भारतातील पहिले इयरबुक प्रकाशित केले.
जून 18, 2008 आमच्या कंपीने एमसीएक्स.कॉम या वेबसाइटच्या गुजराती आणि हिंदी आवृत्त्या सुरू केल्या.
जून 9, 2008 आमच्या कंपनीद्वारे सीईआर (सर्टिफाइड एमिशन रिडक्शन) यातील सौदे सुरू केले.
जून 3, 2008 इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरिटीज कमिशन्स (आयओएससीओ) या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सभासदत्व आमच्या कंपनीला प्राप्त झाले.
मे 23, 2007 आमच्या कंपनीला आयएसओ/आयईसी 27001: 2005 प्रमाणपत्र प्राप्त झाले.
जुलै 24, 2006 युरोनेक्स्ट.लाइफशी आमच्या कंपनीचा करार झाला.
जून 12, 2006 भारतीय पोस्टल नेटवर्कच्या माध्यमातून शेतक-यांच्या शेतीविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच इतर माहिती देण्यासाठी महाराष्ट्रातील जळगाव येथे ग्रामीण सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी आमच्या कंपनीने भारत सरकारच्या पोस्ट खात्याशी करार केला.
जून 5, 2006 एनवायएमईएक्सशी आमच्या कंपनीने लायसन्स करार केला.
डिसेंबर 1, 2005 मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात एमसीएक्सचा सेल सुरू करण्यासाठी आमच्या कंपनीने मुंबई विद्यापीठाशी सामंजस्य करार केला.
ऑक्टोबर 25, 2005 विशिष्ट सौद्यांसाठी आधारभूत किंमत म्हणून लंडन मेटल एक्स्चेंजच्या ऑफिशियल दराचा वापर करण्यासाठी लंडन मेटल एक्स्चेंजशी (एलएमई) आमच्या कंपनीने लायसन्स करार केला.
जून 14, 2005 सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना (एपीएमसी) लिंक-अप करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी विपणन मंडळ (एमएसएएमबी) आणि एनएसईएपी यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) कमोडिटी सूचना केंद्राची स्थापना.
जून 7, 2005 आमच्या कंपनीद्वारे कॉम्पोझीट कमोडिटी फ्युचर्स इंडेक्सची (एमसीएक्स-कॉमडेक्स) सुरुवात
नोव्हेंबर 29, 2004 राष्ट्रीय स्तरावरील कृषी स्पॉट एक्स्चेंज सुरू करण्यासाठी एफटीआयएल आणि नाफेड यांच्यात सामंजस्य करार.
डिसेंबर 8, 2003 सायंकालीन ऑनलाइन फ्युचर्स ट्रेडिंग आणि इंटरनेटच्या माध्यमातून ट्रेडिंग सुविधा सुरू
नोव्हेंबर 10, 2003 आमच्या कंपनीच पहिला ट्रेडिंग दिवस
सप्टेंबर 26, 2003   आमच्या कंपनीला भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयातर्फे कायमस्वरूपी मान्यता.
मे 28, 2002   आमच्या कंपनीचे पब्लिक लिमिटेड कंपनीत रुपांतर आणि आमच्या कंपनीचे नाव बदलून मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड असे नवे नामकरण
टॉप 
 
 
 
कमोडिटी फ्यूचर्सच्या नवीनतम किमतींसाठी “MCX <space> <Commodity Name>“ टाइप करून ५८८८८ वर एसएमएस करा.
© कॉपीराईट २०१०. सर्वाधिकार मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लि. (एमसीएक्स)कडे सुरक्षित | स्पष्टीकरण
१०२४ x ७६८ स्क्रीन रिझोल्यूशनमध्ये साइट अधिक चांगली दिसेल. आयई८ वापरणा-यांनी कॉम्पॅटीबिलिटी व्ह्यू निवडावा.
आरएसएस   
   
आमच्याशी संपर्क ठेवा