होम    आमच्या विषयी    कारकीर्द    संपर्क    प्रतिक्रिया    सामान्य प्रश्न     साइटमॅप      
पर्यायी भाषा:  English | ગુજરાતી | हिंदी
 
MCX MARKET OPERATIONS MCX MARKET DATA Products MCX MEMBERSHIP MEDIA ROOM FTKMC - KNOWLEDGE HUB CORPORATE SOCIAL OPPORTUNITIES INVESTORS DOWNLOADS
 
 
 
दृष्टीक्षेप
 
मल्टीकमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. (एमसीएक्स) हे अतिशय अत्याधुनिक असे इलेक्ट्रॉनिक कमोडिटी फ्युचर्स एक्स्चेंज आहे. याचे मुख्यालय मुंबईत आहे. ऑनलाईन ट्रेडिंग, देशभरातील कमोडिटी फ्युचर्सचे क्लिअरिंग आणि सेटलमेंट व्यवहार करण्यासाठी एक्स्चेंजला भारत सरकारची कायमची मान्यता मिळाली आहे.

नोव्हेंबर 2003 मध्ये एक्स्चेंजच्या कामाला सुरूवात झाली. भारतीय कमोडिटी फ्युचर्स मार्केटमध्ये एमसीएक्सचा 80* टक्क्यांहूनही अधिकचा (सप्टेंबर 30,2011 रोजी संपलेल्या सहामाहीत 87.9 टक्के आणि 2011 या आर्थिक वर्षात 82.4 टक्के) वाटा आहे. भारतातील 1,568 शहरे आणि गावांमध्ये पसरलेल्या 2,47,000 ट्रेडिंग टर्मिनल्सवर एक्स्चेंजचे नोंदणीकृत सभासद व्यवहार करत असतात. फ्युचर्स इंडस्ट्री असोसिएशनने केलेल्या सर्व्हेनुसार कमोडिटीचे व्यवहार करणा-या इतर सर्व एक्स्चेंजमध्ये एमसीएक्स हे पाचव्या क्रमांकाचे^ सर्वात मोठे कमोडिटी एक्स्चेंज ठरले. 30 जून 2011 रोजी संपलेल्या सहा महिन्यांतील कॉण्ट्रॅक्ट्सचे जेवढे व्यवहार झाले त्याचा यासंदर्भात विचार करण्यात आला.

एमसीएक्सकडून सोने, फेरस-नॉन फेरस धातू, उर्जा आणि विविध शेतीविषयक कमोडिटीज अशा प्रकारच्या 40 पेक्षाही जास्त कमोडिटीजचे व्यवहार केले जातात. एक्स्चेंजतर्फे प्रमाणित कमोडिटी फ्युचर्स कॉण्ट्रॅक्ट्स सुरू करण्यात आले आहेत. या फ्युचर्स एक्स्चेंजमधील कॉण्ट्रॅक्ट्समुळे चांगल्या किंमतीच्या शोधासाठी एक चांगली वातावरण निर्मिती होत असते. एक्स्चेंज हे चांदीच्या बाबतीत जगातील क्रमांक एकचे, सोने, तांबे आणि नैसर्गिक वायूच्या बाबतीत क्रमांक दोनचे आणि क्रूड तेलाच्या बाबतीत क्रमांक तीनचे एक्स्चेंज आहे. कॅलेंडर वर्ष 2010 आणि जून 30, 2011 रोजी संपलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत जगभरातील आघाडीच्या कमोडिटी एक्स्चेंजमध्ये किती प्रमाणात व्हॉल्यूमचे व्यवहार झाले ते याच्यासाठी विचारात घेण्यात आले.

एमसीएक्सला तीन आयएसओ स्टॅंडर्ड प्रमाणपत्रे मिळाली आहेत, ज्यात आयएसओ 9001:2008 गुणवत्ता व्यवस्थापन सिस्टिम स्टॅंडर्ड, आयएसओ 14001:2004 पर्यावरण व्यवस्थापन सिस्टिम स्टॅंडर्ड आणि आयएसओ /आयईएक्स 27001:2005 इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टिम स्टॅंडर्ड यांचा यात समावेश आहे. एक्स्चेंजच्या प्लॅटफॉर्मवरून ऍनॉनिमस ट्रेड करता येतो, ज्यामुळे चांगली किंमत शोधता येते. त्याही पेक्षा जास्त म्हणजे, जागतिक पातळीवरील कमोडिटीजचे एमसीएक्सच्या प्लॅटफॉर्मवरून देशांतर्गत लोकांना भारतीय चलनात व्यवहार करणे शक्य होते.

कमोडिटीज फ्युचर्स उद्योगात ज्या काही विकासात्मक घडामोडी होतील त्यात अग्रभागी राहण्याचा एक्स्चेंजचा कायम प्रयत्न असतो. लंडन, न्युयॉर्क आणि जगातील इतर महत्वाच्या जागतिक एक्स्चेंजच्या व्यवहारांच्या वेळांशी आपले व्यवहार सुसंगत असावेत यासाठी संध्याकाळी व्यवहार सत्र सुरू करणारे एमसीएक्सहे भारतातील पहिले एक्स्चेंज होते. स्टील,क्रूड तेल आणि बदाम यांच्यात फ्युचर्स ट्रेडिंगची सुविधा देणारे हे भारतातील पहिलेच एक्स्चेंज आहे. जून 2005 मध्ये एमसीएक्सने एमसीएक्सकॉमडेक्स सुरू केली. देशातील हा पहिलाच कमोडिटी फ्युचर्स इंडेक्स होता. भारताच्या वास्तव बाजारपेठेला लक्षात घेता महत्वाच्या

कमोडिटीज बाबत बाजारात काय घडामोडी घडत आहेत याची महत्वपूर्ण माहिती त्यामुळे सदस्यांना प्राप्त होत असते. आम्ही इतरही काही सूचकांक सुरू केले आहेत. ज्यात एमसीएक्सऍग्री (शेतीविषयक कमोडिटीजचा सूचकांक), एमसीएक्सएनर्जी (उर्जा विषयक कमोडिटीजचा सूचकांक) आणि एमसीएक्समेटल (धातू कमोडिटीजचा सूचकांक) तीन पाऊस विषयक सूचकांकही आहेत. रेनडेक्समुम (मुंबई), रेनडेक्सआयडीआर (इन्दूर) आणि रेनडेक्सजय (जयपूर) यांच्यामार्फत त्या-त्या भौगोलिक क्षेत्रात पडणा-या पावसाचा आढावा घेतला जातो. डिसेंबर 2009 मध्ये आम्ही ईएफपी भारतात पहिल्यांदाच सुरू केली ज्यामुळे फ्युचर्स पोझिशन स्पॉट बाजारात आणि स्पॉट बाजारातून फ्युचर्स पोझिशन मध्ये जाणे पार्टीजना शक्य झाले.

एमसीएक्सने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध ट्रेड बॉडीज, संस्था आणि संघटनांशी संबंध तयार केले आहेत ज्यामुळे आम्हाला आमचा व्यापार आणि मार्केट क्षेत्र विस्तारण्यास मदत होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर आम्ही लंडन मेटल एक्स्चेंज, न्यूयॉर्क मर्कंटाईल एक्स्चेंज, एलआयएफएफई एडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट (नूतनीकरणांतर्गत), बाल्टिक एक्स्चेंज लिमिटेड, शांघाय फ्युचर्स एक्स्चेंज आणि तैवान फ्युचर्स एक्स्चेंज सोबत आमचा स्ट्रॅटेजिक अलायन्स आहे.
 
महत्वाचे समभागधारक
एफटीआयएलने प्रमोट केल्याने एमसीएक्सवर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील ब्ल्यूचिप्सचा विश्वास आहे. एफआयडी फंडस (मॉरिशस) लिमिटेड (फिडेलिटी इंटरनॅशनलशी संबंध), युरोनेक्स्ट एन.व्ही. (एनवायएसई युरोनेक्स्टशी संलग्न) आणि मेरिल लिंच होल्डिंग्स (मॉरिशस) यांचा त्यात समावेश होतो.
 
* स्त्रोतः भारतीय कमोडिटी बाजाराचे नियंत्रक फॉरवर्ड मार्केटस कमिशन (एफएमसी)ने संकलित केलेल्या माहितीनुसार
टॉप 
 
 
ठळक वैशिष्ट्ये
 
 
^स्रोतः 1 जानेवारी, 2011 आणि 30 जून, 2011 या कालावधीत एक्स्चेंजेसच्या वेबसाईट्सवरील तपशील, बाजाराची आकडेवारी आणि फ्यूचर्स इंडस्ट्री असोसिएशनच्या व्होल्युम सर्वे, सप्टेंबर, 2011
कमोडिटी फ्यूचर्सच्या नवीनतम किमतींसाठी “MCX <space> <Commodity Name>“ टाइप करून ५८८८८ वर एसएमएस करा.
© कॉपीराईट २०१०. सर्वाधिकार मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लि. (एमसीएक्स)कडे सुरक्षित | स्पष्टीकरण
१०२४ x ७६८ स्क्रीन रिझोल्यूशनमध्ये साइट अधिक चांगली दिसेल. आयई८ वापरणा-यांनी कॉम्पॅटीबिलिटी व्ह्यू निवडावा.
आरएसएस   
   
आमच्याशी संपर्क ठेवा